गुण गाईन आवडी
राहुल देशपांडे ,मराठी रंगभूमी वरचा एक सुरेल आणि सुस्वरूप गायक कलाकार,वसंत राव देशपांडे यांचा नातू ,,थोडक्यात राहुलचे वर्णन करायचे झाले तर राहुलची गायकी म्हणजे वसंत रावांची पुण्याईआणिती आम्हाला आजच्या पिढीला ऐकायला मिळणे म्हणजे हि आमची पुण्याई. अतिशय स्वच्छ आणि शुद्ध स्वरात गाणारा राहुल हे आजच्या तरुणाई चेच नव्हे तर बुजुर्गांचेही वेड आहे , गायनाचा कुठलाही प्रकार ह्याला वर्ज नाही ,ते कुणीही रचलेले असो कि बांधलेले असो राहुलच्या गळ्यातून उतरून रसिकांकडे पोहचता पोहचता ते राहुलचे गाणे होते ,स्वयंभू गायकीची धन्य म्हणावी अशी हि गायनी कळा राहुलचा गायनावरचा अभ्यास हे उपसानाचे एक रूप आहे ,त्याच्या गायकीत उपासनेला तो उत्सवाचे रूप कधी देतो ते कळतहि नाही ,"निर्गुणी भजनापासून अलबेला साजन आयोरे पर्यंत पोहचणारी त्याची
गायकी सर्व निकषांवर तेव्हढीच सकस आणि सरस ठरते.
मागच्या शनवारी पार्ल्याला संगीत संशय कल्लोळ नाटकाचा देखणा प्रयोग संपन्न झाला ,नेहमी प्रमाणेच रसिक वर्गानी दादही दिली ,आता संगीत शारदा कधी करणार आहेस,सौभद्र ,स्वयंवर,मानपान तू कधी ठरवतो आहेस ,तुझ्या गाण्याची बैठक पार्ल्याला होणार ना,पार्लेकरांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न ठळक पणे दिसत होते ,वसंत रावाचा नातू म्हणजे समस्त पार्ले करांचा नातू असा भाव मनी धृड ठेवोनी पार्लेकर वावरत असतात ,राहुलचे नाटक असो वा गाणे घरचेच कार्य समजून कार्येक्रम चालेले असतात एवढे आम्हा पार्लेकरांचे राहुलवर प्रेम. मध्यंतरात कलाकारांना भेटायला जाऊ नये हा खरेतर शिष्टाचार पण सोयीस्कररीत्या मोडून मी राहुलला भेटायला गेलो ,राहुल बाहेर आला आणि चक्क पाया पडला ,वसंत रावच्या पुंण्याई वर राहुलच्या पालकांनी केलेले सोज्वळ संस्कार,नकळत राहुलच्या भेटीचे शब्दस्वरूप ओठावर आले"पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा"
शशांक रांगणेकर
Wednesday, October 5, 2011
Tuesday, October 4, 2011
satrangi re
प्रिय जनहो
आपल्या अजयचा "सतरंगी रे हा चित्रपट लवकरच वितरीत होईल ,त्याच्या वितरणाच्या अनुषंगाने त्याने बरचसे उपक्रम आयोजित केलेले दिसताहेत
"सतरंगी रे"हा चित्रपट अजयचा नव्हे तर तुमचा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा आहे ,एक सदगुणी साधासुधा मराठी मुलगा हे धाडस करतो आहे
घरात कार्य असले कि घरचे लहान थोर सगळेच सहभागी होतात तसेच सर्वांनी मनापासून सहभागी व्हा ,सतरंगीत एक नव्हे सात रंग आहेत आणि
एक रंग खास तुमच्या आवडीचा नक्कीच असणार,वयानुसार अजयला शुभेच्छा आशीर्वाद द्या आणि सतरांगीच्या सर्व उपक्रमात सहभागी व्हा
सतरंगी आणि तिच्या सर्व उपक्रमांना "हार्दिक शुभेच्छा "

Monday, October 3, 2011
SHRISH DESHPANDE
गुण गाईन आवडी
सहा दिवस काम करून थकलेल्या परमेश्वराला सातव्या दिवशी झोप आली आणि त्यांनी सातव्या दिवशी झोपेत एक स्वप्न पाहिले ते स्वप्न म्हणजे "श्रीश देशपांडे"
तुला दिलेल्या जगात तू काय केलस, ?सर्व धर्माच्या तत्वज्ञानाचे सार श्रीश ने अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे ,परमेश्वरीय कृपेशिवाय हा सारासार विचार सुचत नाही,
डोळे बंद केले कि श्रीश चे एक रूप डोळ्यसमोर येते ,एक तत्वज्ञानी ,सतत आपल्या कृत्यांचा लेखा जोखा शोधात बसणारा एक संत .'pyant आणि shirt मधेही संत
आढळतात कारण ती त्यांची प्रव्वृत्ती असते ,सदैव ईश्वराधीन विचारांची ,व्यवसायाने मातीशी नाते सांगणारा हा गोरा कुंभार विचाराने तुमची कच्ची मडकी भाजून
नक्कीच पक्की करेल फक्त जरूर आहे त्याच्या ब्लोग वरचा शब्द न शब्द वाचण्याची,आत्मसात करण्याची ,

Saturday, October 1, 2011
ajay naik
सष्ट कलांचे वरदान घेऊनच काही माणसे जन्माला येतात ,अजय नायक हे ह्याचेच एक उदाहरण,१३ वर्षे चक्क कॉम्पुटर घाशी (खर्डे घाशी चे नवे भावंड) करणारा हा
कला क्षेत्रात पदार्पण करतो आणि थोड्याच वेळात रसिक मनावर आपला ठसाही उमटवतो सगळाच काही अतर्क्य ,हा नुसताच कविताच करत नाही तर गाणी बांधतोही
गातोही ,आणि अतिशय व्यावसायिक पद्धतीने त्याचे सादरीकरण हि करतो ,त्याच्या काव्याला भाषेचे बंधही नसतात,मराठीत ,फुलणारे त्याचे शब्द हिंदी,इंग्लिश सारख्या
इतर भाषातही तेवढेच फुलतात.लेखक,कवी,यशस्वी निर्माता आणि व्यावसायिक,ह्या सर्व भूमिका बजावता बजावता न लपणारी आणि एक प्रवृत्ती कि एक सहृदय माणूस.
नकळत शब्द ओठावर येतात "कोण असशी तू नकळे मजला."

Subscribe to:
Posts (Atom)