Friday, February 3, 2012

राकेश पांगारे


राकेश पांगारे

आयुष्यात काही माणसे सतत समाज जीवन फुलवण्या साठी जगतात,कविता  करतात ,बोधप्रद लिहितात .आणि व्यवसाय करता करता परमार्थही साधतात ,मिळालेला मानवी जन्म हा इदं मम म्हणत  कार्यरत राहतात ,"स्वताःच्या आयुष्यातला सुगंध वाटत वाटत दुसरयाचे आयुष्य हि सुगंधी करतात,

व्यवसायांनी बांधकाम व्यावसाईक असूनही तुकोबांच्या आदेश प्रमाणे "उत्तम व्हावाहारे jjजोडोनिया धन "ह्या संत वचनाशी बांधिलकी ठेऊन घर बांधतो आणि आपल्या  चोख व्यवहाराचा एक आदर्श (कफ परेड चा नव्हे)उभा करतो,देशांतर करता करता  आपली आणि    आपल्या  छाया चित्र कारीतेची ओळखही "ह्या नव नयन महोत्सवा"पद्धतीने करवतो

एखाद्या पैलूदार हियावर पडल्रले प्रकाशकिरण जसा तो लक्ष पटीनेपरावर्तीत करतो तसा हा मानवी हिरा आहे ,संपन्न आणि सुशिक्षित युवकाचे एक बहु आयामी चित्र ,संपन्नता फक्त धन्राशितच मोजली जात नाही आणि सुशिक्षण  फक्त  पदाव्यावरती अवलंबून नसते त्याची  मोजमाप वेगळीच असतात ,हि बहु आयामी प्रगलभता असुनही तरला पारदर्शी शब्दांची मनमोहक अतिश बाजी करता करता विचारांचे धनही प्रदान करतो .राकेशाचे साहित्य तरुणाईला पडलेले एक सत्यांशी स्वप्नच.


Saturday, January 21, 2012

prasad ganpule

चिरंजीव प्रसाद,
तुझे उत्तर मीळाले धन्यवाद,तुझ्या बद्दल जे काही मी लिहिले आहे ते मला वाटले ते नव्हे तर जे खरे आहे ते लिहिले आहे
निसंशय तुझी सामाजिक कार्याची तळमळ आणि त्याला मिळालेला एक सहृदय चेहरा हे खरोखर नक्षत्रांचे देणे आहे
तुझ्या गुणांचे केलेले कौतुक हे एक तळ्यात पडलेल्या चांदण्या प्रमाणे आहे ,हे तेज तुझ्या गुणांचे आहे माझ्या शब्दांचे नाही
समाजाचे देणे देण्याची हि निर्मल आणि अंगीभूत तळमळ ,हा एक ईश्वरीय प्रसादाच आहे ,तुझे गुण मोठे की माझे गुण वर्णन मोठे
हा प्रश्न्न विष्णू मोठा की विष्णुसहस्त्रनाम मोठे एवढे सोपे आहे आणि उत्तर तुलाही माहित आहे ,तू जे काही कार्य करतोस त्याचे
मूल्यमापन तू करू शकत नाहीस कारण तू ते काम मनातल्या तळमळीने तू करतोस,पोच पावती साठी नाही पण त्याचे मूल्यमापन करून
योग्य ती पोच पावती देणे हे हि एक सामाजिक कर्तव्यच आहे कमीतकमी आम्हाला तेवढे तरी पार पडू दे.
शशांक रांगणेकर

Tuesday, January 17, 2012

chinmay

चिरंजीव चिन्मय.

,म.टा.चा उपसंपादक झाल्याबद्दल ,हार्दिक अभिनंदन ,वृत्तपत्र आणि बातमीदार इतिहास घडवतात हे मराठी वृत्तपत्र सृष्टीला नवीन नाही ,महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडण घडणीत वृत्तपत्रांचा फार मोठा वाटा आहे संदेशकार अच्युत राव कोल्हटकर पासून मराठा .प्र के अत्र्या पर्यंत ,अनेकांनी मोठे योगदान करून अक्षरशः मराठी मनाला घडवले आहे
तुझ्यात कुठेतरी ती निर्भीडता दिसते ,का केव्हा आणि कशी ह्याचे समर्पक उत्तर नाही कदाचित हि हार्दिक इच्छा असावी,बाळशास्त्री जांभेकर यांचे पुण्य स्मरण कर भटक्याची भ्रमंती आठव आणि कामाला सुरवात कर,शुभास्ते पंथः सन्तु .
शशांक रांगणेकर

LikeUnlike · · Share

Wednesday, October 5, 2011

RAHUL DESHPANDE

गुण गाईन आवडी

राहुल देशपांडे ,मराठी रंगभूमी वरचा एक सुरेल आणि सुस्वरूप गायक कलाकार,वसंत राव देशपांडे यांचा नातू ,,थोडक्यात राहुलचे वर्णन करायचे झाले तर राहुलची गायकी म्हणजे वसंत रावांची पुण्याईआणिती आम्हाला आजच्या पिढीला ऐकायला मिळणे म्हणजे हि आमची पुण्याई. अतिशय स्वच्छ आणि शुद्ध स्वरात गाणारा राहुल हे आजच्या तरुणाई चेच नव्हे तर बुजुर्गांचेही वेड आहे , गायनाचा कुठलाही प्रकार ह्याला वर्ज नाही ,ते कुणीही रचलेले असो कि बांधलेले असो राहुलच्या गळ्यातून उतरून रसिकांकडे पोहचता पोहचता ते राहुलचे गाणे होते ,स्वयंभू गायकीची धन्य म्हणावी अशी हि गायनी कळा राहुलचा गायनावरचा अभ्यास हे उपसानाचे एक रूप आहे ,त्याच्या गायकीत उपासनेला तो उत्सवाचे रूप कधी देतो ते कळतहि नाही ,"निर्गुणी भजनापासून अलबेला साजन आयोरे पर्यंत पोहचणारी त्याची
गायकी सर्व निकषांवर तेव्हढीच सकस आणि सरस ठरते.

मागच्या शनवारी पार्ल्याला संगीत संशय कल्लोळ नाटकाचा देखणा प्रयोग संपन्न झाला ,नेहमी प्रमाणेच रसिक वर्गानी दादही दिली ,आता संगीत शारदा कधी करणार आहेस,सौभद्र ,स्वयंवर,मानपान तू कधी ठरवतो आहेस ,तुझ्या गाण्याची बैठक पार्ल्याला होणार ना,पार्लेकरांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न ठळक पणे दिसत होते ,वसंत रावाचा नातू म्हणजे समस्त पार्ले करांचा नातू असा भाव मनी धृड ठेवोनी पार्लेकर वावरत असतात ,राहुलचे नाटक असो वा गाणे घरचेच कार्य समजून कार्येक्रम चालेले असतात एवढे आम्हा पार्लेकरांचे राहुलवर प्रेम. मध्यंतरात कलाकारांना भेटायला जाऊ नये हा खरेतर शिष्टाचार पण सोयीस्कररीत्या मोडून मी राहुलला भेटायला गेलो ,राहुल बाहेर आला आणि चक्क पाया पडला ,वसंत रावच्या पुंण्याई वर राहुलच्या पालकांनी केलेले सोज्वळ संस्कार,नकळत राहुलच्या भेटीचे शब्दस्वरूप ओठावर आले"पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा"

शशांक रांगणेकर

Tuesday, October 4, 2011

satrangi re

प्रिय जनहो
आपल्या अजयचा "सतरंगी रे हा चित्रपट लवकरच वितरीत होईल ,त्याच्या वितरणाच्या अनुषंगाने त्याने बरचसे उपक्रम आयोजित केलेले दिसताहेत
"सतरंगी रे"हा चित्रपट अजयचा नव्हे तर तुमचा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा आहे ,एक सदगुणी साधासुधा मराठी मुलगा हे धाडस करतो आहे
घरात कार्य असले कि घरचे लहान थोर सगळेच सहभागी होतात तसेच सर्वांनी मनापासून सहभागी व्हा ,सतरंगीत एक नव्हे सात रंग आहेत आणि
एक रंग खास तुमच्या आवडीचा नक्कीच असणार,वयानुसार अजयला शुभेच्छा आशीर्वाद द्या आणि सतरांगीच्या सर्व उपक्रमात सहभागी व्हा
सतरंगी आणि तिच्या सर्व उपक्रमांना "हार्दिक शुभेच्छा "
शशांक रांगणेकर

Monday, October 3, 2011

SHRISH DESHPANDE

गुण गाईन आवडी
सहा दिवस काम करून थकलेल्या परमेश्वराला सातव्या दिवशी झोप आली आणि त्यांनी सातव्या दिवशी झोपेत एक स्वप्न पाहिले ते स्वप्न म्हणजे "श्रीश देशपांडे"
तुला दिलेल्या जगात तू काय केलस, ?सर्व धर्माच्या तत्वज्ञानाचे सार श्रीश ने अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे ,परमेश्वरीय कृपेशिवाय हा सारासार विचार सुचत नाही,
डोळे बंद केले कि श्रीश चे एक रूप डोळ्यसमोर येते ,एक तत्वज्ञानी ,सतत आपल्या कृत्यांचा लेखा जोखा शोधात बसणारा एक संत .'pyant आणि shirt मधेही संत
आढळतात कारण ती त्यांची प्रव्वृत्ती असते ,सदैव ईश्वराधीन विचारांची ,व्यवसायाने मातीशी नाते सांगणारा हा गोरा कुंभार विचाराने तुमची कच्ची मडकी भाजून
नक्कीच पक्की करेल फक्त जरूर आहे त्याच्या ब्लोग वरचा शब्द न शब्द वाचण्याची,आत्मसात करण्याची ,
शशांक रांगणेकर