गुण गाईन आवडी
राहुल देशपांडे ,मराठी रंगभूमी वरचा एक सुरेल आणि सुस्वरूप गायक कलाकार,वसंत राव देशपांडे यांचा नातू ,,थोडक्यात राहुलचे वर्णन करायचे झाले तर राहुलची गायकी म्हणजे वसंत रावांची पुण्याईआणिती आम्हाला आजच्या पिढीला ऐकायला मिळणे म्हणजे हि आमची पुण्याई. अतिशय स्वच्छ आणि शुद्ध स्वरात गाणारा राहुल हे आजच्या तरुणाई चेच नव्हे तर बुजुर्गांचेही वेड आहे , गायनाचा कुठलाही प्रकार ह्याला वर्ज नाही ,ते कुणीही रचलेले असो कि बांधलेले असो राहुलच्या गळ्यातून उतरून रसिकांकडे पोहचता पोहचता ते राहुलचे गाणे होते ,स्वयंभू गायकीची धन्य म्हणावी अशी हि गायनी कळा राहुलचा गायनावरचा अभ्यास हे उपसानाचे एक रूप आहे ,त्याच्या गायकीत उपासनेला तो उत्सवाचे रूप कधी देतो ते कळतहि नाही ,"निर्गुणी भजनापासून अलबेला साजन आयोरे पर्यंत पोहचणारी त्याची
गायकी सर्व निकषांवर तेव्हढीच सकस आणि सरस ठरते.
मागच्या शनवारी पार्ल्याला संगीत संशय कल्लोळ नाटकाचा देखणा प्रयोग संपन्न झाला ,नेहमी प्रमाणेच रसिक वर्गानी दादही दिली ,आता संगीत शारदा कधी करणार आहेस,सौभद्र ,स्वयंवर,मानपान तू कधी ठरवतो आहेस ,तुझ्या गाण्याची बैठक पार्ल्याला होणार ना,पार्लेकरांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न ठळक पणे दिसत होते ,वसंत रावाचा नातू म्हणजे समस्त पार्ले करांचा नातू असा भाव मनी धृड ठेवोनी पार्लेकर वावरत असतात ,राहुलचे नाटक असो वा गाणे घरचेच कार्य समजून कार्येक्रम चालेले असतात एवढे आम्हा पार्लेकरांचे राहुलवर प्रेम. मध्यंतरात कलाकारांना भेटायला जाऊ नये हा खरेतर शिष्टाचार पण सोयीस्कररीत्या मोडून मी राहुलला भेटायला गेलो ,राहुल बाहेर आला आणि चक्क पाया पडला ,वसंत रावच्या पुंण्याई वर राहुलच्या पालकांनी केलेले सोज्वळ संस्कार,नकळत राहुलच्या भेटीचे शब्दस्वरूप ओठावर आले"पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा"
शशांक रांगणेकर
No comments:
Post a Comment