Monday, July 11, 2011

rohan

    • रोहन मंकानी,
      परी कथेतला राजकुमार कसा असावा कसा दिसावा ,आदर्श,सहृदय देखण उमदा ,समाजकारण करताकरता स्वच्छ राजकारण करणारा आहेरे पासून नाहीरे पर्यंत समाजाच्या सर्व घटकांना हवाहवासा
      वाटणारा ,एवढे शब्द वापरण्या पेक्षा केवळ दोनच शब्दात सांगायचे झाले तर "रोहन मंकानी"सारखा.एक उमदे व्यक्तिमत्व पुण्यनगरीत उदयास येत आहे.राजकीय बजबजपुरी भ्रष्टाचार जातीयवाद सारख्या
      अनाचारांच्या पास्र्श्व भूमीवर आपल्या स्वच्छ आणि निखळ समाजकारणाचा वसा घेतलेला हा वयाने लहान असूनही विचारांनी कित्तरी मोठा असलेला हा युवक फक्त तरुणांचाच नव्हे तर सर्व वयो गटांना
      आपलासा वाटतो आहे..भ्रष्ट आणि अनाचारी राजकारण्यांच्या काळोखी गर्दीत आपल्या सदाचारी आणि स्वच्छ समाजाकारणाने तळपणारा ह्या युवकाला पाहून कवितेच्या दोन ओळी आठवतात
      'रे खिन्न मना बघ जरातरी घन तमी शुक्र बघा राज्य करी."
  • Shashank Ranganekar
    • प्रिय रोहन,
      तुझे उत्तर वाचले आणि वाटले की जेकाही लिहिले आहे ते नक्कीच अपुरे आहे ,तुझ्या चांगुलपणाचे यतार्थ वर्णन करण्या एवढी
      शब्द सम्पत्ती माझ्या कडे नाही ,आपल्या कडून चुका होतील असे समजून चालणाऱ्या माणसाच्या चुका तो स्वताच सुधारतो
      आणि त्या मानवी चुका असतात अमानुष नसतात ,असे म्हणतात की "प्रत्येक प्रेषिताचे पाय मातीतेच असतात "पण तुझ्या सारखा
      सहृदय माणूस जेव्हा प्रेषित रुपात येतो तेव्हा ते पाय मातीचेच नसतात मातीत घट्ट रोवलेले हि असतात .अश्या पायांवर भविष्यातली
      माणुसकी उभी आहे ह्याची प्रचीती पाव्लोवली येते
      शशांक रांगणेकर..
      WednesdayShashank Ranganekar
      प्रिय जनहो,
      कधी कधी नियती भविष्याचे संकेत देत असते ,का केव्हा ,कशाला ह्याचे उत्तर नसते
      रोहनच्या देहबोलीतून प्रतीत होत असते की हा युवक भविष्यातला मराठी राजकारणातला
      विन चा घोडा ठरेल,८०%समाजकारण आणि २०% राजकारण करत करत हा जनमानसात
      अग्रगण्य ठरेल ते कळणारही नाही ,महाराष्ट्रातल्या ह्या भावी नेत्याला मनःपूर्वक शुभेच्छा
      शशांक रांगणेकर

No comments:

Post a Comment