Thursday, July 21, 2011

BAJI DARADE

चिरंजीव बाजी,
तू अण्णांना दिलेला मौलिक सल्ला आवडला ,तो वास्तवाला धरूनही आहे,
पण अण्णा हे वास्तव बदलू पाहत आहेत,आणि ते नैतिक अधिष्ठान त्यांच्या
कडे आहे ,दुर्दैवाने स्वतान्त्रोयोत्तर काळा नंतर आम्ही तुमच्या पिढीला काहीही
विश्स्वसार्ह्या असे काहीही देऊ शकलो नाही पण अण्णांच्या रूपाने एक प्रेषित
अवतरतो आहे त्या प्रेषिताचे मनातल्या सर्व शंका कुशंकांना दूर सारून आपण
सर्वानेच स्वागत करावे अशी कळकळीची विनंती ,लोकपाल विधेयकाचा गोवर्धन
आपल्या नीतिमत्तेच्या करंगळीवर लीलया उचलतील पण आपापल्या काठीने
जर मनापासून कुठलेही शंकित मनात ना धरता आपण पाठींबा दिला नाही
तर भविष्याच काय वर्तमानही आपल्याला क्षमा करणार नाही.
शशांक..
April 23Shashank Ranganekar
गुण गाईन आवडी
मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्या दोघीही रत्न गर्भा आहेत
face बुक च्या माध्यमातून बरेचसे कलंदर शिलेदार आपापली
मुलूखगिरी करताहेत ,समाजशास्त्र पासून मानसशास्त्र पर्यंत आणि
गाथे पासून कथे पर्यंत सर्वायामी संचार करणारी हि मंडळी
मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान जोपासतात आहे
शतप्रतिशत मराठी असलेल्या ह्या मराठी सुपुत्रांना गुण गाईन आवडी
चा सलाम.ह्या शिलेदारांमाधले एक बिन्नी चे नाव "बाजी दर्डे"
नावाप्रमाणेच सर्वच लेखन प्रकारात विचारांची बाजी धगधगीत
शब्दाने मारणारा हा छोटा शिलेदार कर्तृत्वानी आणि विचार
संपदेने यशाची शिखरे गाठतो

1 comment:

  1. गुण गाईन आवडी
    परमेश्वर हा कृपाळू आहे ह्या बद्दल शंकाच नाही ,aaushyachya कोणत्या वळणावर कोण भेटेल हे कदाचित नियतीही सांगू शकत नाही
    वयाची ६२ वर्षे पुरी करता करता ह्या बळीच्या दरवाज्यात एक २६ वर्षीय वामन येतो आणि बुद्धी वाणी आणि विचार पदक्रांत करून चौथे
    पाउल कुठे ठेऊ म्हणून विचारतो त्याला बळीने उत्तर काय द्यायेचे?देण्यासारखे राहते तरी काय सदैव हाच प्रश्न छळत राहतो ,
    माझा मित्र बाजी दराडे जेव्हा जेव्हा मला भेटतो अथवा माझ्याकडे बोलतो तेव्हा तेव्हा हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा राहतो
    ह्याला कुठल्यातरी वैचारिक खिंडीत गाठायचे म्हंटले तर ह्या शिपायाने ती खिंड अगोदरच पावन केलेली असते ,साहित्य ,काव्य विचार
    लिखाण सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा हा माझा छोटा मित्र आता गणेश उत्सवासाठी गाणी लिहिणार आहे तिथेही तो बाजी
    मारेलाच ह्या बद्दल शंकाच नाही ". पुणे तिथे काय उणे "मित्रानो बाजी पुण्याचः आहे.
    शशांक रांगणेकर

    ReplyDelete